मुंबई : भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे द्रष्टे उद्याोगपती, दानवीर, टाटा उद्याोगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. आपल्या प्रकृतीस धोका नसल्याचे त्यांनी सोमवारी समाजमाध्यमांवर जाहीर केले होते. परंतु बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालविल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी निवेदनाद्वारे जाहीर केली.